- अन्नामृत फाउंडेशनच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन; ३०० शाळांतील विद्यार्थ्यांना लाभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ सप्टेंबर २०२६) :- विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक आहार मिळावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अन्नामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय स्वयंपाकगृहाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील सुमारे ३०० शाळांमधील ५७ हजार विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराची व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंपाकगृह अद्ययावत करण्यात आले असून, आहार तयार करण्यापासून वितरणापर्यंत स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन केले जाणार आहे.
महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांना मिळणारा प्रत्येक घास सुरक्षित, पौष्टिक व गुणवत्तापूर्ण असावा, यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य पोषण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या सुविधेसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार श्रीकांत भारतीय यांचे विशेष सहकार्य लाभले. उद्घाटनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, गौरांग प्रभू, आमदार अमित गोरखे, राजेश पांडे, नगरसेविका सारिका मासुळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

















