- स्वच्छता, सुरक्षा व नागरिकांच्या सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ सप्टेंबर २०२६) :- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रमुख विसर्जन घाटांवरील स्वच्छता, सुरक्षा आणि नागरिकांच्या सुविधांची महापौर रवि लांडगे यांनी पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व सुविधा वेळेत पूर्ण करून मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विविध विसर्जनस्थळांची पाहणी:
सुभाष घाट, पिंपरी, अहिल्यादेवी होळकर घाट, वेताळ महाराज घाट, सांगवी, वाकड गावठाण घाट, चिंचवड येथील थेरगाव पूल घाट, जाधववाडी घाट, रावेत, इंद्रायणी नदी घाट तसेच मोशी खाण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. स्वच्छता, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, निर्माल्य संकलन, दिशादर्शक फलक, कृत्रिम विसर्जन हौद आणि सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून विद्युत व्यवस्था, कृत्रिम हौद, विसर्जन मार्ग आणि घाट परिसर सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले. सीसीटीव्ही, जीवनरक्षक, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवण्यावरही भर देण्यात आला.
यावेळी सविता खुळे, प्रियंका कुदळे, निकिता कदम, तृप्ती कांबळे, आरती चोंधे, रेश्मा भुजबळ, राहुल कलाटे, राम वाकडकर, उमा खापरे, मंदार देशपांडे, शेखर अण्णा चिंचवडे, सुरेश भोईर, ऐश्वर्या तरस, राजेंद्र तरस उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, डॉ. प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, सहायक आयुक्त तानाजी नरळे, सह शहर अभियंता अनिल भालसाखळे, महेश कावळे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता सोहम निकम, जहिरा मोमीन, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


















