- प्रत्येक कामाला कालमर्यादा; पुढील बैठकीत ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- भूसंपादन, जागा हस्तांतरण, आरक्षण आणि प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एमडी पॅटर्न’ राबविण्याचे निर्देश आमदार महेश लांडगे यांनी दिले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सात प्रमुख प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल, भूसंपादन, भूमी अभिलेख, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
भोसरी मतदारसंघातील २२ ‘मिसिंग लिंक’ तसेच रस्ते रुंदीकरणाची कामे भूसंपादनामुळे रखडली आहेत. त्याबाबत आवश्यक क्षेत्रफळ, जमीनमालक, मोबदला आणि भूसंपादनाची सद्यस्थिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तळवडे-चऱ्होली इंद्रायणी नदीकाठचा रस्ता, मोशी-डुडूळगावमधील गोल्फ कोर्स व स्पोर्ट्स क्लब, IIMसाठी जागा, गुरुकुल संस्थेची जागा, इको-टुरिझम प्रकल्प आणि तलाठी सजा कार्यालयांसाठी जागा या विषयांचाही आढावा घेण्यात आला.
प्रत्येक कामासाठी नोडल अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा ठरवून पुढील बैठकीत ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
– महेश लांडगे, आमदार…


















