- सचिन काळभोर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध मिळकती, शाळा, उद्याने आणि अन्य आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी रखवालदार मदतनीसांच्या कामकाजाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त विजयजी सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
कंत्राटदार संस्थांची नावे, कंत्राटाची मुदत व रक्कम, प्रभागनिहाय मनुष्यबळ, मंजूर व प्रत्यक्ष कार्यरत कर्मचारी, कर्मचाऱ्यांची यादी, वेतन वितरण, हजेरी व बायोमेट्रिक नोंदी यांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीएफ, ईएसआयसी, पोलीस पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि कंत्राटातील अटींच्या पालनाबाबतचे अभिलेख देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मंजूर आणि प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळात तफावत असल्यास तसेच कंत्राटी कामकाजात अनियमितता आढळल्यास संबंधितांची चौकशी करून प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

















