- पाच उपअभियंत्यांची कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती..
- १० कनिष्ठ अभियंते झाले उपअभियंता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, आरोग्य विभागातील विविध पदांसह विद्युत आणि तांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या पदोन्नती व पदस्थापनांना अंतिम मंजुरी दिली आहे.
स्थापत्य विभागातील उपअभियंता दीपक करपे, किरण अंदुरे, मनोज बोरसे, शेखर गुरव आणि चंद्रकांत मोरे यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर संजय लोखंडे, अनिल गडदे, विवेक ताकवाले, अमोल उंडे, तानाजी ढेकळे, संदीप ठोकळे, सचिन मगर, श्रीनिवास कोरेवार, प्रतीक भसारकर आणि चेतन देसले या दहा कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता पदावर बढती मिळाली आहे.
अनुरेखक पुष्पराज भागवत यांची आरेखक, तर सांख्यिकी सहाय्यक सौरभ टेकवडे यांची सांख्यिकी पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
लेखा विभागात शुभांगी चव्हाण, विनोद झुंझुरके, प्रियांका रणसिंग, अश्विनी निगडे, रोजश सोलंकी, पल्लवी कुलकर्णी, संदीप पवार आणि गणेश कोमकर यांना लेखापाल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
विष्णू त्रिकोणे, रोहिदास शेटे, देवीदास कुंभार, रवींद्र शिंदे, प्रमिला गायकवाड, नीता राणे, राकेश सौदे, विशाल भोईर, शिवाजी खेडकर, नंदा ढेंगळे आणि उमेश बांदल यांची कार्यालय अधीक्षकपदी पदोन्नती करण्यात आली आहे. एएनएम सियोना बनसोडे यांना नर्स मिडवाईफ पदावर बढती देण्यात आली आहे.
आरोग्य विभागातही पदोन्नती देण्यात आली असून, अतुल सोनवणे, योगेश फल्ले आणि कांचनकुमार इंदलकर यांची सहाय्यक आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सुशील मलैय आणि अमित पिसे यांना मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
स्टाफ नर्स रजनी भुजबळ, राजश्री मखामले, प्रतिभा टाकळकर, अंजली तेलगू, कल्याणी जगदाळे, हेमतला शेवकर, माधुरी जिड्डीमनी, कविता जाधव, स्नेहा परब, माधुरी पंदारे, विद्या खलाटे, उज्वला कोंद्रे, वनीता गावडे आणि भारती मानमोडे यांची सिस्टर इनचार्ज म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. असिस्टंट मेट्रन सुरेखा कापरे यांना मेट्रन पदावर बढती देण्यात आली.
विद्युत विभागातील लक्ष्मण इटकर आणि राघवेंद्र धर्मकांबळे यांना कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नती मिळाली आहे. कुंदन ढोरे, नाना नरुटे, चंद्रकांत कोंढवळे, राहुल सावंत, विजय काळाणे, अमोला चव्हाण, कृष्णा पारगे, संदीप पाटील, रमेश राठोड, प्रवीण गाडेकर आणि सुनीला कांबळे यांना विद्युत पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. मेंटेनन्स हेल्पर सुहास ताकवले यांची फिटर पदावर पदोन्नती झाली आहे.
कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या…
पदोन्नतीसोबतच कार्यकारी अभियंता संवर्गातील काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्याही करण्यात आल्या आहेत. वैशाल ननावरे यांची स्थापत्य मुख्यालयात, हरविंदरसिंग बन्सल यांची अ क्षेत्रीय कार्यालयात, विजय जाधव यांची ग क्षेत्रीय कार्यालयात, सुनील शिंदे यांची ज क्षेत्रीय कार्यालयात, तर हेमंत देसाई यांची बांधकाम परवानगी विभागात बदली करण्यात आली आहे. नव्याने कार्यकारी अभियंता झालेल्या दीपक करपे यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालय, किरण अंदुरे यांच्याकडे ल क्षेत्रीय कार्यालय, मनोज बोरसे यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प, शेखर गुरव यांच्याकडे झोनिपू स्थापत्य, तर चंद्रकांत मोरे यांच्याकडे स्थापत्य मुख्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


















