- उड्डाणपुलाच्या खांबाला धडक..
- डंपरची ट्रॉली पुलाखाली अडकली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑक्टोबर २०२६) : काळेवाडी फाटा चौकात मध्यरात्रीच्या सुमारास हायवा डंपरचा विचित्र अपघात घडला. उड्डाणपुलाच्या खांबाला आणि खालच्या गर्डरला धडक बसल्याने डंपरची मागील ट्रॉली पुलाखाली अडकली. त्यामुळे डंपरचा मागील भाग हवेत लटकला होता. सोमवारी (दि. २६) पहाटे सुमारे दोन वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर उड्डाणपुलाजवळून जात असताना हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर डंपरची मागील ट्रॉली पुलाच्या खालच्या भागात अडकली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अडकलेला डंपर बाहेर काढण्यात आला. या अपघातात डंपर चालक सुदैवाने सुखरूप बचावला. मात्र, डंपर उड्डाणपुलाच्या खांबाला आणि गर्डरला नेमका कसा धडकला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


















