न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२६) :- Astrotalk व तत्सम ऑनलाइन ज्योतिष ॲप्सच्या जाहिरातींद्वारे नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारींची चौकशी करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
सोशल मीडियावरील जाहिरातींमधून प्रेमसंबंध, विवाह, करिअर आणि आर्थिक भविष्याबाबत दावे केले जातात. कलाकार व इन्फ्लुएन्सर्सच्या प्रमोशनमुळे नागरिक प्रभावित होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अनुचित व्यापार पद्धती आणि अंधश्रद्धाजन्य प्रथांना प्रोत्साहन दिले जात असल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तपासणी करून जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.


















