- तीन गावांत उभारले बंधारे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑक्टोबर २०२६) :- खेड तालुक्यात जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने ‘मिशन बंधारा २०२६’ अंतर्गत किंजळे तर्फे नातू, नांदीवली आणि चाटव या तीन गावांत ग्रामस्थांच्या सहकार्याने बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे, भूजल पातळी वाढविणे तसेच शेती आणि पर्यावरणासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देत संस्थेने जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला.
या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव नंदकुमार महाडिक, खजिनदार अरुण यादव, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, मधुकर कदम, संदीप सकपाळ, विकास महाडिक यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर सहभागी झाले. जलसंवर्धन ही काळाची गरज असून, पाण्याचे संवर्धन करून भविष्य सुरक्षित करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.


















