- स्त्यावर अननसांचा खच; अननस नेण्यासाठी फुकटयांची गर्दी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ ऑक्टोबर २०२६) : वाकडमधील जिंजर हॉटेलसमोर अननसाने भरलेला मालवाहू ट्रक उलटल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, ट्रकमधील मोठ्या प्रमाणातील अननस रस्त्यावर विखुरले. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.
ट्रक उलटल्याने रस्त्यावर सर्वत्र अननस पसरले होते. यावेळी काही नागरिकांनी पुढे येत मदतीचा हात दिला. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी रस्त्यावर पडलेले अननस घेऊन जाण्यासाठी गर्दी केल्याचेही दिसून आले. त्यामुळे अपघातस्थळी मदत आणि अननस गोळा करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.
या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला का, तसेच अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.


















