न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २७ ऑक्टोबर २०२६) : दरोडा घालण्याच्या उद्देशाने आवश्यक साधनसामग्री जवळ बाळगल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री नऊच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गालगत, वडगाव फाट्याच्या अलीकडे सीआरपीएफच्या कंपाउंडजवळ घडली.
आर्यन अनिल गरुड (वय १९), यश प्रल्हाद राजगुरू (वय १८), विशाल गंजाळ (वय २०), गुरू गरुड (वय २४) आणि हर्षल सतीश सोनवणे (वय १९) सर्व राहणार तळेगाव दाभाडे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलीस शिपाई विशाल दादाराम थोरात (वय ३१, नेमणूक तपास पथक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली. आरोपींनी सामाईक उद्देशाने दरोड्याच्या तयारीसाठी लागणारी साधनसामग्री जवळ बाळगल्याचा आरोप आहे. पोलीस उपनिरीक्षक देडगे तपास करीत आहेत.


















