न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :-भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अर्टिगा कारने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना मंगळवारी (दि. २६) मध्यरात्री १२.५६ वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील मारुंजी रोडवरील राजमुद्रा पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात ऑरा कारचालक आणि दुचाकीस्वार जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाले आहे.
संतोष सुनील जायभाय (वय २४, व्यवसाय चालक, रा. मावळ, जि. पुणे) असे अर्टिगा चालकाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील अर्टिगाने विरुद्ध दिशेने येत अक्षय जाधव (वय २८) यांच्या वाहनाच्या चालक बाजूस समोरून धडक दिली. त्यानंतर पुढे उभ्या असलेल्या ऑरा कारला आणि दुचाकीला धडक बसली. दुचाकीस्वार निहाल मुजावर (वय २४) जखमी झाले.
अक्षय अशोक जाधव यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी तपास करीत आहेत.


















