- गुरुद्वारा चौकातील घटनेने परिसरात खळबळ; जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाल्हेकरवाडी (दि. २७ ऑक्टोबर २०२६) :- वाल्हेकरवाडी येथील गुरुद्वारा चौक परिसरातील पोळी-भाजीच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या तत्पर कार्यवाहीमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात आली.
















