न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०९ नोव्हेंबर २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीला महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्राद्वारे नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार शहर जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी २५ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
नवीन कार्यकारिणीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान या कार्यकारिणीत शहर सरचिटणीसपदी प्रा. जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काशिनाथ जगताप यांच्याकडे उपाध्यक्षपदासह प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय विविध पदांवर अन्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे…
शहर सरचिटणीस प्रा. जयंत शिंदे, उपाध्यक्ष व प्रवक्ता काशिनाथ जगताप, उपाध्यक्षपदी शकुंतला भाट, प्रशांत कापसे, अनिल भोसले, अॅड. अमोल गव्हाणे, मयूर जाधव, माणिक जैद पाटील, सुनील कस्पटे, सचिन चावरे, अॅड. सोपान पाटील, अमोल पाटील यांची तर, कोषाध्यक्षपदी विजयकुमार पिरंगुटे, चिटणीसपदी अॅड. संतोष शिंदे, राजू खंडागळे, विजय बाबर, राहुल धनवे, संजीवनी पुराणिक, नितीन मोरे यांची तर, संघटक सचिवपदी ज्ञानेश आल्हाट, सुनील पवार, रणजीत आवटे, सचिव सुदाम शिंदे, विवेक विधाते, प्रमोदिनी लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.

















