- २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजन; देशभरातील खेळाडूंचा सहभाग..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ नोहेंबर २०२६) :- देहूनगरीत प्रथमच ९ वी राष्ट्रीय सवाते स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुयुद्ध सवाते असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान सरस्वती लॉन्स येथे ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, मुख्याधिकारी चेतन कोंडे आणि उपनगराध्यक्ष योगेश काळोखे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रवी लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा सेवादलाचे अध्यक्ष प्रवीण पिंजण, ह.भ.प. महेंद्र महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, शिवाजी महाराज मोरे आणि विवेक काळोखे उपस्थित राहणार आहेत.
तसेच सवाते असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक शुभवर्धन सिंह, अध्यक्ष हंसराज बामभुते, सचिव परमजीत कौर आणि अनुयुद्ध सवाते असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष शाम शाही यांची उपस्थिती लाभणार आहे.
देशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, सवाते खेळाच्या प्रसारासह खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. सचिव सुहास घाईजे व आयोजक समितीने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


















