न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १८ नोव्हेंबर २०२६) :- शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिक संस्था, महाराष्ट्र विद्यालय मैदान येथे उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिनव तरुण मंडळ, जुनी सांगवी (किल्ले विजयदुर्ग), द्वितीय क्रमांक अभिषेक काळे व ऋतुराज कविटके, लांडेवाडी (किल्ले राजगड), तर तृतीय क्रमांक हनुमान ग्रुप, रहाटणी (किल्ले जंजिरा) यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे ३,०००, २,००० व १,००० रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.
नगरसेवक यश साने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष राज जाधव, राज्य सचिव तेजस राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व तावरे, शहर अध्यक्ष ऋषी शिरसाट, उपाध्यक्ष सिद्धार्थ तावरे, संघटक तन्मय कुदळे, सरचिटणीस ओम गोधडे, सचिव दिगंबर कदम, कार्याध्यक्ष मयूर काठे आणि संपर्कप्रमुख स्वप्नील चिखले उपस्थित होते. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


















