- ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक; मित्र गंभीर जखमी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १९ नोहेंबर २०२६) :- कुदळवाडी परिसरातील अलमिनार शाळेसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा २० वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १४ जून २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुदळवाडी पुलाजवळ घडली.
कुलदीप राममूरत गौतम (वय १८, रा.चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सागर राजू परिहार (वय २०) असे जखमी मित्राचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप आणि त्याचा मित्र सागर हे स्प्लेंडर दुचाकीवरून मोरे पाटील चौकातून जॉर्गस पार्क, शाहूनगर, चिंचवडच्या दिशेने जात होते. यावेळी कुलदीप याने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरून येणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाला दुचाकीची धडक बसली.
या अपघातात दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. कुलदीप याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सागर याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन डोक्याला दुखापत झाली आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हाके पुढील तपास करीत आहेत.

















