न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- संस्कार ग्रुपने ग्राहकांची केलेली फसवणूक ही केवळ १९ कोटी ७९ लाखांची नसून हा फसवणुकीचा आकडा १०० कोटींहून अधिक असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने माहिती न्यायालयात देण्यात आली. तसेच यामध्ये गुंतवणुकदारांची संख्या १० हजारांहून अधिक होणार असल्याचा अंदाज आर्थिक गुन्हे शाखेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने संस्कार अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्यकारी संचालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अजय माधव लेले (वय ४८, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या कार्यकारी संचालकाचे नाव आहे.
याप्रकरणात १६ जणांवर गुन्हे दाखल असून संस्कार ग्रुपचा म्होरक्या वैकुंठ कुंभार व व त्याची पत्नी राणी कुभांर अद्याप फरार आहेत. एप्रिल २०१० ते २०१६ दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.











