न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीप्रमुखांचा पखवाज भेट देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दिंडीने जनजागृती फलक व घोषणा देत स्वच्छतेचा संदेश दिला.
भोसरीतील दिघी मॅगझिन चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत आयुक्त हार्डिकर, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, माजी महापौर नितीन काळजे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे आदि उपस्थित होते.











