न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीने नुकतेच आकुर्डी विठ्ठल मंदिर परिसरातून पंढरीकडे प्रस्थान केले. यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी पालखीत सामील वारकऱ्यांना जमेल तशी मदत केली.
पालखी आकुर्डीत विसाव्यास होती. आकुर्डी प्राधिकरण मधील सेक्टर २७, शास्त्रीनगर येथे आझमभाई पानसरे युवा मंच व आई बाबा प्रतिष्ठानच्या वतीने पालखीचे स्वागत केले. तसेच भव्य महाप्रसाद व अन्नदान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्विकृत नगरसेवक सुनिल कदम व दाम्पत्याने सहकुटुंब पालखीची पूजा केली. तसेच युवा नेते निहाल पानसरे व स्वीकृत नगरसदस्य सुनील कदम मित्र परिवाराने वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधांचा लाभ दिला. वारकऱ्यांनीही या महाप्रसादाचा लाभ घेत तृप्तता मिळविली.











