न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरात १ लाख तुळशीचे रोपटे वाटप करण्यात येणार आहे. तसेच तुळशीचे रोपटे औषधी वनस्पती असल्याने त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरीकांना होणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने या उपक्रमाचे पिंपरी चिंचवड शहरात उद्या शुक्रवार (दि. १२) रोजी तुळशी रोपटे वाटपाचा कार्यक्रम होणार असून, या उपक्रमात शहरातील लाखो नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.












