न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या हेतूने देवीचंद आगरवाल तुळजापूरवाले यांच्या पुढाकाराने रामनगर येथे मोफत दवाखाना सुरू करण्यात आला.
दवाखान्याच्या उदघाटन प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश बाबर, आगरवाल फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बंसल, देवीचंद आगरवाल, भोसरी आगरवाल समाजाचे माजी अध्यक्ष देवीसेठ आगरवाल, डॉ संतोष आगरवाल, पवन गोयल, ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या रुग्णालयात डॉ. संतोष आगरवाल, डॉ रमेश बंसल, डॉ सुनील मित्तल हे मोफत रुग्णसेवा देणाऱ आहे. या दवाखान्यामुळे रामनगर, विद्यानगर, मोहन नगर परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.


















