न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०१९) :- शिवसेनेने ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे व ब प्रभाग अधिकारी संदीप खोत यांना घेराव घातला. शिवसैनिक व नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देखील या अधिकार्यांना देता आली नाही. घरोघरी कचरा संकलन नवीन करारनामा ठेकेदार धार्जिन असल्यामुळे संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे देखील हतबल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
घरोघरी कचरा संकलन व वाहतूक करण्याच्या निविदेबाबत २०१७ पासून प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू होती. परंतु, दि. १ जुलै २०१९ पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. लोकप्रतिनिधी, सुज्ञ नागरीक, महीला भगिनी, व्यापारी महापालिका हद्दीमधील तज्ञ व वरील अधिकारी यांच्या समवेत करारनामा समजून घेतल्यानंतर दुर्देवाने, असे निदर्शनास येते की, करारनाम्यातील अटी–शर्ती या ठेकेदार धार्जिन आहेत व महानगरपालिका अधिकारी वर्ग यांचे ठेकेदारावरील नियंत्रण दुबळे करण्यात आल्याचे लक्षात येते. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे नियंत्रणहीन झाले असून शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
निविदेतील व करारनामामधील अटी-शर्ती यांचा फेरविचार व्हावा, याकरिता आयुक्तांनी आरोग्य वैदकीय अधिकारी, सर्व प्रभाग अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रभाग निहाय आढावा घेऊन शहरवासियांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हास शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिला.
याप्रसंगी योगेश बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अनीता तुतारे, अश्विनी चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, शर्वरी जळमकर, प्रतिक्षा घूले, कमल गोडांबे, जयश्री काळभोर, वैशाली कुलथे,शैलाताई निकम, वंदना खंडागळे, बाळासाहेब वाल्हेकर, विजय साने, चेतन शिंदे, सचिन चिंचवडे, संतोष घाडगे, सुरेश राक्षे, सर्जेराव मारनुरे, दिलीप भोंडवे, ज्ञानेश्वर शिंदे व सुज्ञ नागरिक धोंडीराम सायकर, मीना पोकर्णा, अशोक घुमे, प्रकाश सावंत, अनिल कांबळे, लतिष बालकवडे, दत्ता संगमे, दिनकर आवारे, नागेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.












