न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनहित लोकशाही या पक्षाकडून नताशा लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, पत्रकार परिषदेत हे जाहीर करण्यात आलं.
नताशा लोखंडे चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. नताशा लोखंडे यांच्यासह चार उमेदवारही निवडणूक लढवणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मावळ विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.















