न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- रस्त्याचे काम सुरू असताना अनियोजित कारभारामुळे अंतर्गत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशीच घटना आज चिंचवडमधील भोईरनगर चौकात घडली. आज पहाटे अचानक पाण्याचे फवारे उडाले आणि याप्रकारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रकट अनेकदा घडत असतात याबाबत कित्येकदा नागरिक संतप्त व्यक्त करतात मात्र अधिकारी व ठेकेदारांची लागेबांधी असल्याने अशा घटना दुर्लक्षित केल्या जातात. याचाच प्रत्यय आज पुन्हा पहावयास मिळाला.
भोईनगर चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी आज पहाटे पाण्याची जलवाहिनी फुटून पाण्याचे उंच फवारे उडत होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची धावपळ झाली. अनेक जण संबंधित विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. पाण्याचा प्रवाह वाहत होता. रस्त्यासाठी खोदलेल्या भागात पाणी साठत राहिल्याने परिसरात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.















