न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण परिसरात अज्ञात तीन चोरांनी रो हाऊसवर दरोडा टाकला. या घटनेत तब्बल ८ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला आहे.
या घटने प्रकरणी गोविंद निवृत्ती जाधव (वय-५०) यांनी चाकण पोलिसात तक्रार दिली आहे. घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गोविंद निवृत्त जाधव हे त्यांच्या कुटुंबासह चिंचवड येथे मुलीला भेटण्यास आले होते. तेव्हा, त्यांच्या घरी कोणी नसल्याचे खात्री बाळगून मंगळवारी पहाटे च्या सुमारास अज्ञात तीन चोरांनी रो हाऊसवर दरोडा टाकला यात १५ तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख २ हजार रुपयांची रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांचे स्पोर्ट शूज देखील अज्ञात तीन जणांनी चोरून नेले आहेत. मंगळवारी जाधव कुटुंब घरी आल्यानंतर दरोड्याचा घटना समोर आली आहे. या घटने प्रकरणी चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.