न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- विवाहितेकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच लग्न झाल्यापासून नऊ महिने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. या प्रकरणी पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत घोडेगाव जवळील सुपेधर येथे घडली. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ३३ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.