न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- पिंपरी डेपो येथे नवीन टाटा कंपनीच्या मिडी बसचे काम करत असताना अचानक रेस वाढून इंजिनाचा स्फोट झाला. ही घटना मंगळवारी (दि. १०) रोजी घडली. या अपघातात सीएनजी डेपोत काम करणारे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. हिरामण आल्हाट, मोहन लक्ष्मण ढेंगळे असे जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पिंपरीतील पीएमपीच्या बसडेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानक रेस वाढल्याने इंजिनाचा स्फोट झाला. त्यातील जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी घरी सोडण्यात आले. मात्र, अशाप्रकारे स्फोट होण्याची गेल्या काही महिन्यातील तिसरी घटना आहे. नवीन खरेदी केलेल्या गाड्या अत्यंत निकृष्ट प्रकारच्या असून सहा महिन्यांच्या आतच त्यांनी दुरुस्तीसंदर्भात खूपच कामे काढली आहे.