न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- आरोही राम गगे जी. जी. इंटरनेशनल स्कुल, पिंपरी हिने ऑक्टोबर २०१९ मध्ये नांदेड येथे झालेल्या सी . बी . एस . ई. राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत ती व तिच्या टीमने रौप्य पदक पटकावले आणि नोव्हेंबर २०१२ मध्ये पंजाब येथे झालेल्या सी . बी . एस . ई . राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावाले याबद्दल तिचे स्थायी समिती सभेत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका नम्रता लोंढे, आरती चोंधे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, सहाय्यक आयुक्त अजित पवार व आदी उपस्थित होते.