न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २५, ताथवडे, पुनावळे व वाकड येथील आज दि. २१/१२/२१०९ रोजी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाणे चालू असलेले अनधिकृत आर.सी.सी. बांधकाम व पत्राशेड यावर कारवाई केली.
सदर कारवाईमध्ये दोन आर.सी.सी. बांधकाम, क्षेत्रफळ- २८४.०० चौ.मी. ( ३०५५.८४ चौ.फुट) व नऊ पत्राशेड क्षेत्रफळ १४०५.०० चौमी. ( १५११७.८ चौ फुट ) यावर कारवाई केली.
सदर कारवाई संबधित प्रभागाचे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियांता, आबासाहेब ढवळे, कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे पथकाने केली. सदर कारवाई १५ पोलीस, ०२ जे.सी.बी, ०१ ट्रक्टर ब्रेकर ०१, ०८ मजूर व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने
करणेत आली.















