न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- उन्नती सोशल फाऊंडेशन च्या वतीने पिंपळे सौदागर मधील जेष्ठ नागरिकांना एस.टी.पास काढून देण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या जेष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या पास सेवेचा नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे पिंपळे सौदागर मधील जेष्ठ नागरिकांना वर्षाला ४००० कि.मी. पर्यंतचा प्रवास अर्धे प्रवास शुल्क देऊन करता येणार आहे. वाढत्या महागाईमुळे कामावरून निवृत्त झालेल्या लोकांसाठी जेष्ठ नागरिकांसाठी असे उपक्रम घेतले जातील. ज्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल असे मत उन्नति सोशल फाऊंडेशन संस्थापक संजय भिसे यांनी व्यक्त केले. या उपक्रमाअंतर्गत पिंपळे सौदागर मधील एकूण १८० जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले तर आभार रमेश वाणी यांनी मानले.


















