न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सुमारे ७९५५ कर्मचारी अधिकाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार असून अप्रत्यक्ष म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड ही पहिली महानगरपालिका ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे हा निर्णय त्वरित झाला असून याचे संपूर्ण श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे,माजी महापौर योगेश बहल,मंगलाताई कदम ,महिला अध्यक्ष वैशाली काळभोर ,माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक मयूर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी,युवक अध्यक्ष विशाल वाकडकर ,प्रदेश सरचिटणिस विशाल काळभोर ,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे,अंबर चिंचवडे तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्याला पाच वर्षात केवळ आश्वासनाची गाजरे वाटली. कोणताही प्रमुख निर्णय त्यांना घेता आला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने सातवा वेतन आयोगकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र माझ्याकडून त्यांना पदरी निराशाच मिळाली. दरम्यान महा विकास आघाडीची सत्ता राज्यात येताच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी सर्वप्रथम सातवे वेतन आयोग लागू तात्काळ होणार असल्याची घोषणा केली होती आणि त्यांनी त्या शब्दा खरा करून दाखवला. नुकत्याच नागपूर येथील झालेल्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाली हा निर्णय केवळ अजित दादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामुळे तात्काळ झाला आहे म्हणून इतर कोणी काही म्हणत असेल तरी त्याचे श्रेय केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला जात असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.


















