न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जानेवारी २०१९) :- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध केला. भाजप सरकार आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने व मूक आंदोलन करण्यात आले.
पिंपरी, खराळवाडी येथे आज (सोमवारी) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस संदीप चिंचवडे, विशाल काळभोर, चेतन फेंगसे, प्रतिक साळुंखे, अक्षय माछर ,वेदांत माळी, श्रीनिवास बिराजदार, शदाब खान, तुषार सोनवणे, मयुर थोरवे, फरदीन सय्यद, अशोक भडकुंबे, अजय थोरात, राजू वारभुवन, स्वप्नील कांबळे, रोशन वाघमारे, अनिल पारवे, रमन्दीप कोहली, प्रसाद कोलते, रामदास करंजकर, धनंजय जगताप, सैफ खान, राजेंद्र थोरात आदी युवकांनी सहभाग घेतला.















