न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जानेवारी २०१९) :- भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असणाऱ्या पुस्तकाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्याचबरोबर या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या मध्यप्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या सेवा दलाचाही तीव्र निषेध करण्यात आला.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आज (सोमवारी) झालेल्या आंदोलनात महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी व आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्यात या पुस्तकाच्या प्रदर्शन व विक्रीवर बंदी घालण्यात यावी. अन्यथा या विरोधातील आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा यावेळी शहर भाजपाच्या वतीने देण्यात आला.


















