न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- प्रभाग क्र. २१ पिंपरीमधील श्रीमती. अनुसया वाघेरे शाळेच्या प्रांगणात नव्याने उभारलेल्या माजी कार्यकारी अभियंता कै. दिलीप गुलाबराव कुदळे २० दशलक्ष लिटर जलकुंभाचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला.
यावेळी संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, श्रीमती. संध्या दिलीप कुदळे यांच्या शुभहस्ते तसेच नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे-पाटील, नगरसेवक डब्बू आसवाणी, मा. नगरसेवक प्रभाकर वाघेरे, नगरसेविका निकीता कदम, रंगनाथशेठ कुदळे, श्रीमती संध्या दिलीप कुदळे व पिंपरीतील महिला भगिनी व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
नगरसेविका उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी वाढती लोकसंख्या तसेच उद्भवत असलेला पाणी प्रश्न महापालिका आयुक्त तसेच स्थायी समिती सभेमध्ये निदर्शनात आणून दिला. या माध्यमातून सतत पाठपुरावा करून पिंपरीमधील पाणी प्रश्न सोडविला.


















