- समाजाच्या माध्यमातून दिन-दुबळ्यांसाठी भरीव कार्य होणार – संतोष सौंदणकर
- अहिर सुवर्णकार समाजाच्या चिंचवडगाव येथील नूतन वास्तूचे उद्घाटन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- अहिर सुवर्णकार समाजाच्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या चिंचवडगाव येथील नूतन वास्तूचे रविवारी (दि. ०५) रोजी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, समाजाचे आधारस्तंभ व शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, पुण्याचे अध्यक्ष नंदकुमार वडनेरे, पिंपरी चिंचवड समाजाचे अध्यक्ष सुनिल निकुंभ, उपाध्यक्ष ऋषिकेश देवरे, सचिव भगवान वानखेडे, खजिनदार किरण सोनार, दिपक सोनार, प्रविण सोनार, शिवाजी सोनार, योगेश बाविस्कर, वर्षा सोनार, स्मिता सोनार, विनोद दुसाने, कृष्णकांत पिंपळगावकर, नंदकिशोर निकुंभ, वसंत सोनार, देवेंद्र घोडनदिकर, नीता कापडणेकर व जेष्ठ सभासद उपस्थित होते. समाजाच्या माजी अध्यक्षांचा यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
खासदार बारणे यांनी समाजाने एकत्ररित्या कोणाचीही मदत न घेता स्वखर्चाने बांधलेल्या वास्तूबद्दल कार्यकारणीचे कौतुक केले. तसेच समाजातर्फे वर्षभर राबविलेले समाजोपयोगी कार्यक्रम ज्यात स्नेह संमेलन, नरहरी महाराज जयंती, रक्तदान शिबीर, आषाढी वारीनिमित्त वारीतील वारकऱ्यांना मदत, वधू-वर मेळावे, या सारखे उपक्रम स्तुत्य आहेत. खासदार म्हणून मी समाजाच्या पाठीशी ठाम उभा आहे. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
संतोष सौंदणकर म्हणाले की, अहिर सुवर्णकार समाज हा स्वयंप्रेरित आहे. समाजातल्या दानशूर मंडळींनी समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच आपले योगदान दिले आहे. अहिर सुवर्णकार समाजाने स्वखर्चातून चिंचवडगाव येथे नूतन वास्तूची निर्मिती केली. संस्थेच्या माध्यमातून समाजातील दिन-दुबळ्यासाठी भरीव कार्य होणार आहे. त्यासाठी अहिर सुवर्णकार समाज या संस्थेची कार्यकारिणी सदैव तत्पर असणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सुनिल निकुंभ, सूत्रसंचालन ऋषिकेश देवरे व आभार माजी अध्यक्ष दिपक सोनार यांनी केले.















