न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०१९) :- महामेट्रोने पिंपरीतील प्राधान्य मार्गावर बहुतांश कामे काही दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती. वर्षअखेरीस दोन ट्रेन पिंपरीत दाखल झाल्या. मेट्रो धावण्यासाठी वीजवाहक तारा प्रवाहित करण्यात आल्याने शुक्रवारी सायंकाळी दीड किमीच्या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली.
यापुढील काळातही मेट्रोच्या आणखी चाचण्या घेण्यात येणार असून, मेट्रो सुरक्षा आयुक्तांसह (सीएमआरएस) इतर प्राधिकरणांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्पष्ट केले.












