न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०१९) :- १२ वर्षीय अल्पवयीन पीडीत मुलीला तिच्या पिंपरी येथील शाळेच्या प्रवेशव्दारावर आरोपी भेटला. मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, असे त्याने मुलीला सांगितले. चल तुला शंकर महादेव मंदिराकडे देहूरोडला फिरायला नेतो, असे सांगून देहूरोड जवळील एका डोंगराच्या जंगलात मुलीला घेऊन गेला.
तेथे मुलीसोबत अश्लिल चाळे केले. तसेच जबरदस्ती करून मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले. ही घटना गुरुवारी (दि. ९) रोजी पिंपरीत सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर ऊर्फ महादेव पांडूरंग सूर्यवंशी (वय २८, रा. जोतिबानगर, तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) याला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.












