न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व साह्यकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मिनी मॅरॉथॉनचे आयोजन करण्यात आले. एक पाऊल आरोग्याकडे या ब्रीद वाक्य घेऊन यावेळेचे हे ३ रे वर्ष यावर्षीसुद्धा परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत भाग घेतला.
सकाळी ६ वाजता या मॅरॉथॉन ला सुरुवात झाली. सुरुवातीला झुंबावरती सर्वांनी डान्स केल्यानंतर १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर असे रूट ला स्पर्धक धावत गेले. या मॅरॉथॉनसाठी चीफ गेस्ट म्हणून अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीरंग इनामदार हे होते.
या कार्यक्रमासाठी मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे व बाबाजी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या मॅरॉथॉनमध्ये १००० लोकांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धक धावून आल्यानंतर सर्वांना नाश्ता व चहाची व्यवस्था केली होती. नंतर परत झुम्बा झाला. त्यानंतर विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.















