न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०१९) :- ओला उबेर टॅक्सी सेवा लोणावळ्यात बंद करा या मागणी करीता लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनात लोणावळा शहरातील रिक्षा चालक मालकांनी ममोठया संख्याने उपस्थित राहुन आंदोलनास पाठिबा दिला. आणि काळ्या फित लावुन ओला उबेरचा निषेध केला.
या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संथापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी उपस्थित राहुन आंदोलन कर्त्याना मार्गदर्शन केले. रिक्षा चालकांचे जेष्ठ नेते बाबुभाई शेख , संजय भालेराव , आनंद सदावर्ते , मल्हारभाऊ काळे, गणेश चव्हाण , भाऊ माळसकर , राजु बोडके ,दिलीप जाधव , भगवान घनवट , सूर्यकांत ठाकुर , भाऊ शिवेकर , भगवान घनवट , कैलास गव्हाणे , अरुण फंड , राजु तांबोळी , रमेश सपकाळ , शंकर पवार , संजय नन्नवले, प्रकाश वाघ , मनोज मोगरे , आनंद साठे , आदी उपस्थित राहुन रिक्षा चालकांचे नेत्तुत्व केले.
लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असुन येथील स्थानिक भूमिपुत्रांनी रोजीरोटी करिता टॅक्सी व रिक्षाचा व्यवसाय सुरू केला आहे . मात्र , ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने ऑनलाईन बुकिंग घेत नागरिकांना कमी दरात प्रवासी सुविधा पुरवली जात असल्याने स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. सदरची टॅक्सी सेवा लोणावळा शहरातून बंद करावी, या मागणी करिता आजचे उपोषण करण्यात आले.
यावेळी मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके, टॅक्सी चालक मालक संघटना पदाधिकार्यासह प्रभारी नगराध्यक्ष श्रीधर पुजारी, जेष्ठ नेते दत्तात्रय गवळी, महाराष्ट्र वाहतुक सेना अध्यक्ष उदय दळवी , परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुरेश भोर , युवानेते यशराज नेरकर , नगरसेवक निखिल कविश्वर, राजु बच्चे, दिलीप दामोदरे , सुधिर शिर्के, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजु बोराटी, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी , शिवसेना उपतालुका प्रमुख गबळू ठोंबरे, समनव्यक बाळासाहेब फाटक , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , शिवसेना लोणावळा शहरप्रमुख सुनिल इंगुळकर , नगरसेविका पूजा गायकवाड, संध्या खंडेलवाल , सुवर्णा अकोलकर, स्वाभिमान संघटना अध्यक्ष शोकत शेख , शिवसेना महिला आघाडी समनव्यक अमृता पठारे, अमोल केदारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देत उपोषणला पाठिंबा दर्शविला.
चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष महेश केदारी, हेमंत मेणे, मंगेश कदम, निखिल कविश्वर, अमोल शेडगे, नरेंद्र निकाळजे, गणेश कदम यांच्यासह चालक मालक मोठया संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.


















