न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शुक्रवारी (दि. १७) रोजी कार्य. अभियंता राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनखाली स्पाईन सिटी मॉल चौक, नविन आरटीओ, संत नगर चौक, काली माता मंदिर चौक, तिरुपती बालाजी चौक, सेक्टर १०, रिच ग्रेवीस कंपनी समोर, विश्वेशर चौक, रिचवूड सोसायटी नाल्यावरील व फुटपाथवर रस्त्यावर ठेवलेल्या हातगाडय़ा, टपरी इत्यादी चे अतिक्रमण हटवून, साहित्य जप्त करण्यात आले.
यात मोठा पत्रा शेड, लोखंडी टपरी, हातगाडी, लोखंडी काऊंटर, चार चाकी व तीन चाकी वाहने, एक ट्रक Loose साहित्य व पत्र शेड निष्कासित करण्यात आले. ही कारवाई पथक क्रमांक ३ चे कर्मचारी, मनपाचे १० पोलीस, ठेकेदार, ४ मजुर, १ क्रेन, ६ डंपर च्या सहाय्याने करण्यात आली, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.


















