न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०१९) :- मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, रिक्षा चालकांचे कर्ज माफ झाले झाले पाहिजे, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झालेच पाहिजे, ओला उबेर सह महाराष्ट्रातील बेकायदेशीर वाहतक बंद झालीच पाहिजेत रिक्षा चालक मालकांना घरकूल मिळालेच पाहिजे या सह इतर विविध मागण्या शासन दरबारी प्रलबीत आहेत.
या मागण्या सोडवुन घेण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतुत्वाखाली संपर्क अभियान आणि सह्याची मोहिम राबवली जाणार असुन (दि. १५ जानेवारी ते ३० जानेवारी) दरम्यान पुणे शहरात ही मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा चालकांचा सर्वेचा फार्म भरून नुकतेच या अभियानाची सुरवात करण्यात आली.
रिक्षा चालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी विशेष असा रथ तयार करण्यात आला आहे. संपर्क अभियान रिक्षा चालकांशी संवाद साधुन त्यांचे प्रश्न आणीअडचणी समजुन घेतल्या जाणार आहेत. रिक्षा भाडेवाढबाबत रिक्षा चालकांचे मत जाणुन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनावर रिक्षा चालकांच्या सह्या घेऊन सह्याची मोहीम राबवली जाणार आहे. रिक्षा चालकांचे सर्वेक्षण फॉर्म देखील या वेळी भरले जाणार आहे.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत वरिष्ठ उपाध्यक्ष रिक्षा चालकांचे जेष्ठ नेते आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर, पुणे रिक्षा फेडरेशनचे बाबा शिंदे, बाप्पू भावे, प्रदिप भालेराव, शिवाजीनगर रिक्षा संघटनेचे दत्ता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा संघटनेचे बाप्पू धुमाळ, प्रदीप रवळे यांच्या मार्गदर्शना खाली हे अभियान राबवले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष नितिन शिंदे, पुणे शहर अध्यक्ष सदाशिव पवार, प्रदेश संघटक लखन लोंढे, सोमनाथ कालाटे, प्रफुल शुक्ला, अनिल पाटोळे, सागर धर्मे, गोविंद पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.












