न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०१९) :- मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिका-यांची प्रशिक्षणांतर्गत मनपास भेट पिंपरी १९ जानेवारी २०२०- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिका-यांनी आज महापालिकेच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व मलनि:सारण प्रकल्पास भेट दिली.
यशदा प्रशिक्षण केंद्र पुणे, यांच्या तर्फे अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मंत्रायलातील अर्थ मंत्रायलयाचे सह सचिव- ज्ञानदेव सुळ, नगर विकास विभागाचे उपसचिव- कैलास बदान, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव- गीता कुलकर्णी, उर्जा व उद्योग विभागाचे उपसचिव- प्रशांत बडगेरी, शहर विकास विभागाचे उपसचिव- विजय चौधरी, ग्रामिण विकास विभागाचे उपसचिव- एकनाथ गागरे, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागाचे उपसचिव- राजेंद्र गेंगजे, नियोजन विभागाच्या उपसचिव- विद्या हंपय्या, वसई विरार महानगरपालिकेचे अति. आयुक्त- रमेश मनाले, कामकार कल्याण विभागाचे उपसचिव- डॉ. श्रीकांत पुलकुंदवार, अल्पसंख्यांक विकास विभागाचे उपअभियंता- दिनेश सोनवणे, मृदसंधारण विभागाचे उपसचिव- मच्छिंद्रनाथ शेळके, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे उपसचिव- विलास थोरात उपस्थित होते.
महानगरपालिकेचे मलनि:सारण व पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी मलनि:सारण प्रकल्पाची तर कार्यकारी अभियंता प्रविण लडकत यांनी जलशुद्धीकरण केंद्र प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील मोकळ्या जागेवर मंत्रालयातील अधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपन देखील करण्यात आले.
उपस्थितांचे स्वागत माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर यशदाचे समन्वयक गोरक्ष गोफणे यांनी आभार मानले.















