न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०१९) :- श्री. गणेश व्यायाम मंडळ संचालित पंम्कीन किड्स आयोजित ‘चित्रकला स्पर्धा २०२०’ चे रविवारी (दि. १९) रोजी मोरेवस्ती चिखली येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता ७० विविध वयोगटातील मुला मुलींनी सहभाग घेतला.
आजकाल च्या युगामध्ये सर्व लहान मुले मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मुलांना विविध खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी मल्लखांब खेळाचे व पंम्कीन किड्सच्या नवीन युनिटचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पिं. चिं. स्पोर्ट असोसिएशनचे सचिव संजय (सर) शेलार, खजिनदार श्रद्धा शेलार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन प्रथमेश आंबेरकर यांनी तर, पंम्कीन किड्स चे सभासद अक्षय खानविलकर, अनिरुद्ध मंचेकर, अक्षय मंचेकर, विराज ओरझकर, हर्षद वाडेकर यांचे मुख्य योगदान होते.















