न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या विविध कामांसाठी येणा-या सुमारे १०९ कोटी ५८ लाख ७७ हजार रुपयांच्या कामांना स्थायीने मान्यता दिली आहे. स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि. २२) रोजी झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.
बोऱ्हाडेवाडी येथील ताब्यात गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधणेकामी ११ कोटी ७५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. वॉर्ड क्र.४ येथील आरक्षण क्र.२/१२२ मध्ये शाळा इमारत बाधणेकामी ११ कोटी ७९ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग क्र.१४ दत्तवाडी, विठ्ठलवाडी, परिसर इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जलनि:सारण सुधारणा कामे करणेकामी येणाऱ्या ३२ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.६मधील नाशिक हायवेच्या पुर्वेकडील भागात मलनि:सारण नलिकांची कामे करणेकामी येणा-या ३६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ड प्रभागातील नदीच्या कडेने असलेल्या गुरूत्व वाहिनीचे देखभाल दुरूस्ती कामे करणेकामी येणा-या ३८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. किर्तीनगर, विनायकनगर, समर्थनगर, उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल व दुरुस्ती करणेकामी ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. २३ व २४ मध्ये येणऱ्या नाल्यातील अस्तित्व असलेली ड्रेनेज लाईन स्थलांतरीत करणेकामी ६७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.१४ मधील विवेक नगर, तुळजाई, भागातील डी.पी.रस्त्याचे मजबुतीकरण/ सुधारणा/ नूतणीकरण/ क्रॉकीटीकरण करणेकामी येणा-या ३ कोटी ३५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. निगडी येथील से-२२ मधील विद्युत दाहिनीचे वार्षिक पद्धतीने चालन देखभाल करणेकामी येणाऱ्या ३४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१५ मधील मनपा इमारतीची देखभाल दुरूस्तीची कामे करणे व फर्निचर व्यवस्था करणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय पर्यंतचा १८ मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ७५ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ५ गवळीनगर व सँडविक कॉलनी परीसरात बंद पाईप गटर व स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ४७ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी केंद्राअंतर्गत प्रभाग क्र. ३१ रामनगर, व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणाऱ्या ४६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. चिंचवड लिंकरोड बाजूकडील यशोपुरम, संत गार्डन व साई ग्रेस सोसायटी समोरील व एम्पायर ईस्टेट येथे उड्डाणपुलाखाली स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या ९ कोटी २३ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मैलाशुद्धीकरण केंद्र व पंपीग स्टेशन मधील विद्युत पुरवठा पुर्ववत करणेकामी आवश्यक व अनुषंगिक कामे करणेकामी येणाऱ्या ८१ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव उपविभाग वार्ड क्र.२३ मधील रस्त्यावरील रुंदीकरणातील व सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत मंडळाचे लघुदाब/उच्चदाब खांब, तारा व फीडर पिलर हलविणेकामी येणाऱ्या २८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१४ मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या २६ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२७ रहाटणी श्रीनगर, नखातेनगर, साईसागरनगर परीसरामध्ये रस्ते क्रॉकीटचे करणेकामी येणाऱ्या १३ कोटी ४४ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.२ मधील गट नं. ६०६ आरक्षण १/४४६ येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणेकामी येणाऱ्या १२ कोटी
२८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. तापकीरनगर, बळीराज कॉलनी व गावठाण येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणेकामी येणाऱ्या ११ कोटी ६८ लाख रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.