न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असतानाही समन्यायी पाणी वाटपाचे कारण पालिकेने दिले आहे.
दोन महिन्यांसाठीच एकदिवसाआड पाणीपुरवठा केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दोन महिन्यात अनधिकृत नळजोड, मोटारी जप्त करुन सुसुत्रता आणाली जाणार होती. याबाबतची मुदत उद्या शनिवारी (दि. २५) रोजी संपणार आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त उद्या या बाबतचा अधिकृत निर्णय घेतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली.












