न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारी (दि. ३०) रोजी भोसरीतील इंद्रायणी थडी जत्रा, अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारील परिसर तसेच पिंपरीतील खराळवाडी, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अजमेरा, रसरंग, झीरो बॉयीज चौक, यशवंत नगर चौक इत्यादी ठिकाणी अनधिकृत हातगाडय़ा, टप-या, पथारीवाले यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत हातगाडी, स्टॉल, मंडप, पथरी, लोखंडी टेबल, लोखंडी टपरी, लोखंडी काऊंटर, जाहिरात बोर्ड, प्लास्टिक क्रेट, स्टील पिंप, टेम्पो बॉडी, लोखंडी बाकडे आदी साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पथक क्रमांक ३, मनपाचे पोलीस होमगार्ड, क्रेन, ५ डंपर याच्या सहाय्याने करण्यात आली, अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.















