न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२०) :- फिर्यादी मोहननगरमधील अलिकॉन कास्टएलॉय लि. या कंपनीत नोकरीला आहे. आरोपी ओमकार चौधरी हा कामगार ठेकेदार, मोनूकुमार सुरक्षारक्षक सुपरवायझर, हिम्मत हा वाहनचालक असून उमेश हा कंपनीतील कामगार आहे. या चौघांनी कंपनीतील ट्रँगल यार्ड समोरील दोन लाखांचे १४०० किलो अॅल्युमिनिअम रॉड चोरून नेले.
याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी रॉड आणून दिले. आरोपींकडे अधिक चौकशी केल्यानंतर कंपनीतील यापूर्वी झालेल्या चोरीमध्ये आरोपींनीच ३३०० किलो वजनाचे पाच लाखांचे अॅल्युमिनिअम रॉड चोरून नेल्याचे कबूल केले. याप्रकरणी ओमप्रकाश मेवाराम अग्निहोत्री (वय-५९, रा. विमाननगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ओमकार आंबिकाप्रसाद चौधरी (वय-२६, रा. चिंचवड, मूळ उत्तर प्रदेश), मोनूकुमार वसंत सिंग (वय-२४, रा. चिखली), हिम्मत उत्तम धनवडे (वय-४०, रा. बिजलीनगर, चिंचवड), उमेश सुभाष बांगर (वय-२६, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.