- आयुक्तांकडून अर्थसंकल्प स्थायीस सादर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 17 फेब्रुवारी 2020) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 628 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज सोमवारी (दि. 17) रोजी स्थायी समितीला सादर केला.
सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा तीसरा अर्थसंकल्प सादर केला आहे.