न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- चिंचवडमधील कृष्णानगर येथील रायरेश्वर प्रतिष्ठानतर्फे रायरेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी विविध विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र उत्सवाची सुरुवात शिवजंयतीच्या कार्यक्रमाने करण्यात आली. रायरेश्वराच्या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी महिला भजनी मंडळींनी भजनरुपी सेवा सादर केली.
आजपासून दोन दिवस महाशिवरात्र उत्सव होणार आहे. या उत्सवानिमित्त दररोज सायंकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत सुश्राव्य कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज (दि. २१) रोजी ह.भ.प. संतोष महाराज काळोखे विठ्ठलवाडी, देहूगाव यांचे सुश्राव्य कीर्तन, २२ फेब्रुवारी रोजी विनोदाचार्य ह.भ.प. नरेंद्र महाराज गुरव मालेगांवकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा लाभ आसपासच्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन रायरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत भैरवकर, उपाध्यक्ष केशव ढेकणे व विश्वस्त बापू सोनावणे व इतर विश्वस्तांनी केले आहे.












