न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कामगार सेलची ३३ जणांची जम्बो पिंपरी – चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून शहराध्यक्षपदी किरण चंद्रकांत देशमुख यांची, तर मुख्य सल्लागारपदी माजी नगरसेवक अरूण बो-हाडे यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीरव खटकाळे यांनी ही निवड केली आहे. उर्वरित कार्यकारिणीमध्ये आठ उपाध्यक्ष, तीन कार्याध्यक्ष, सात सरचिटणीस, सहा सचिव, तर सात सहसचिव यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी दिपक मोंडोकार, सतीश देशमुख, अरूण कळंबे, रमेश अर्धाले, संतोष शिंदे, अनिल घोरपडे, संदीप शिंदे व दीपक गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
कार्याध्यक्षपदी गोपीचंद जगताप, राकेश चौधरी व दामोदर वहिले यांची, तर सरचिटणीसपदी प्रवीण यादव, राजाराम सावंत, मयूर देशमुख, राजेंद्र आचार्य, सुरेश झावरे, तानाजी बोरे व सुदाम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी वालवणकर, गणेश लंगोटे, नवनाथ शिंदे, अविनाश घोगरे, ज्ञानेश्वर पाचवे व समीर शिलेदार यांची सचिवपदी, तर राहूल गायकवाड, आकाश पालकर, जितेंद्र पारे, वैलास देवरे, प्रफुल्ल शिंदे, विजय गायकवाड व सुनिल मोहिते यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे.












